Monday, July 15, 2013

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगती फाऊंडेशनचे “उड्डाण”


प्रगती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत राज्यामध्ये समाजोपयोगी विविध सामाजिक, आरोग्य व शैक्षणिक उपक्रम चालविले जातात. यासाठी येणारा खर्च संस्था आपल्या स्वखर्चाने करीत आहे.
राज्यातील पिडीत महिला, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या महिला / निराधार अल्पसंख्य वर्गातील महिला आणि मागासवर्गीय अल्पशिक्षित अशा महिलांना सक्षमीकरण करण्याच्या हेतूने संस्थेने ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध जिल्ह्यातील निवडक महिला दत्तक घेऊन त्यांना त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी योग्य व्यवसाय उभारणी पर्यंतचे सर्वप्रकारचे मार्गदर्शन व सहाय्य करण्याचे काम संस्थेने “उड्डाण” एक झेप स्वालंबनाकडे या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचे योजले आहे.
या अभियानाचा मुख्य उद्देश संपूर्ण महाराष्ट्रातील गरजू व निराधार महिलांना शिक्षण रोजगार व आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे.

सदरचा प्रकल्प पायलट प्रकल्प म्हणून प्रथमच मुंबई, ठाणे व नवी मुंबई विभागात राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी दिनांक १४ जुलै २०१३ रोजी ठाणे जिल्हा पालकमंत्री तथा राज्य उत्पादक शुल्क मंत्री मा. श्री. गणेशजी नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर “उड्डाण” प्रकल्प प्रशिक्षणाची सुरुवात येत्या १ सप्टेंबर २०१३ पासून होत आहे. त्यात सहभागी होणार्‍या महिलांचे त्यांच्या योग्यतेनुसार गट बनवून त्यांना शिवणकला , संगणक प्रशिक्षण, अकाऊंटिंग, नर्सिंग यासारख्या विविध विषयात त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच स्वसंरक्षण व आरोग्याच्या दृष्टीने योग प्रशिक्षण या विषयांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या प्रशिक्षणा नंतर रोजगार किंवा स्वयंरोजगार संस्था उपलब्ध करून देणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्च प्रगती फाऊंडेशन चारिटी शो , सी एस आर फंड, आणि विविध दानशूर व्यक्ती तथा संस्था यांच्यामार्फत जमा होणार्‍या निधीतून करण्यात येणार आहे.  तरी मदतनीधी उभारण्यासाठी इछुकांनी संस्थेला सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री किरण राणे यांनी केले.

मा. श्री. गणेशजी नाईक यांनी संस्थेस सामाजिक आणि लोकपोयोगी कार्यास पोचपावती म्हणून रुपये पाच लाख मदतीची जाहीर घोषणा केल व भविष्यात ही चांगल्या कामासाठी मी अशीच मदत कारेन असे आश्वासन दिले.
या प्रसंगी नवी मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 66 चे नगरसेवक श्री रंगनाथ औटी , नवी मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष श्री विकास महाडीक, पत्रकार श्री अतुल माने , सचिव श्री नरेंद्र पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भास्कर धाटवकर , सन्म्वयक श्रीमती सायली कदम , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव आदि मान्यवर उपस्थित होते.

या अभियानामार्फत पात्र ठरणार्‍या लाभार्थी महिलांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. महिला महिलासाक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने उड्डाण या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून. या उपक्रमाची संपूर्ण माहिती व सदर प्रशिक्षणाचे अर्जं आमच्या संकेतस्थळावर www.pragatifoundation.com व जुईनगर मधील कार्यालयावर लवकरच उपलब्ध होणार आहेत. तर इच्छुक महिलांनी ह्या सुवर्ण संधीचा फायदा जरूर घ्यावा ही विनंती.
- See more at: http://uddan.pragatifoundation.com/newsid=14072013003.html#sthash.hPN6RjKm.dpuf

No comments:

Post a Comment